Wednesday, May 21, 2008

माझी पहिली कविता

Hi friends..


This was my first ever marathi poem..i have written this long back in college days..but posting it here now..luckily could find marathi font also..never tried this before..so hope script doesnt conatin any mistake..


शब्द ….

शब्द असतात भावना ,शब्द म्हणजे विचार,
शब्दांच्याही पलिकडले शब्दच सांगतात सार .
शब्द म्हणजे आशा ,करतात स्वप्न साकार ,
थकलेल्या मनाला शब्दच असतात आधार .

शब्द म्हणजे वात्सल्य ,
जे असत आईच्या कुशीत ,घराच्या सावलीत .
शब्द म्हणजे प्रेम ,
जे हृदयात ओथंबुन येत , डोळयातून गहिवरत .
शब्द म्हणजे अनुभव ,
जे शिकवतात जगायला ,आपल माणूस ओळखायला .
शब्द म्हणजे मित्र ,
जे आयुष्यभर साथ देतात ,उदास मनाला उभारी देतात .
शब्द म्हणजे दुःख ,
जे अपार वेदना देत ,आपल्यांची नव्याने ओळख पटवातात .
शब्द म्हणजे तलवार ,
जे जिंकतात रणांगन ,तोडतात अजोड नाती पण .
शब्द म्हणजे पाउस ,
जो असतो अलवार ,कधी रिमझिम कधी मुसळधार .
शब्द म्हणजे विश्वास ,
जे फुलवतात आशा , दाखवतात नवी दिशा .
शब्द म्हणजे अश्रु ,
जे असतात नेहमी आपले ,सुख- दुःखात समान साथ देणारे .
शब्द म्हणजे सौंदर्य ,
जे घालतात मोहिनी ,जणू कोणी कामिनी .
शब्द म्हणजे तेज ,
जग उजळून टाकणारे ,पण सूर्याहुनही दाहक असणारे .
शब्द म्हणजे सावली ,
थकल्या जीवाला विसावा देणारे ,काहिली मिटवणारे .
शब्द म्हणजे स्वप्न ,
जिद्द जागवणारे कर्तुत्वाला पुकारणारे .
शब्द म्हणजे आकाश ,
जे असतात अमर्याद ,नाही ज्यांचा थांग .
शब्द म्हणजे बाण ,
जिव्हारी लागणारे ,पण परत ना फिरणारे .


नजरेची भाषा पुरते जर शब्दाला नसला वाव ,
पण शब्द आहेत दर्पण ,सांगतात मनातला भाव .
सांगता येत नाही शब्दात , शब्द म्हणजे काय ,
काय आहे त्याचे मूल्य ,सामर्थ्य त्याचे काय…